Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“वाझेंच्या अटकेने भाजपाला आनंदाचे भरते! अर्णबच्या अटकेचा बदला!” ‘सामना’ची टीका

March 15, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sachin vaze

मुक्तपीठ टीम

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी ठेवल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेवरून आता भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना नव्याने सुरु झाला आहे. नव्या डावात भाजपा वाझेंवरून शिवसेनेला थेट लक्ष्य करत असताना आज सामनाच्या अग्रलेखात भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामींना अटक केल्याचा भाजपाने बदला घेतल्याचा सूर लावण्यात आला आहे.

सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे:

• महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता व शौर्य याची वाहवा जगभरात असताना २० जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे, हे आश्चर्यच आहे. सचिन वाझे यांचे काही चुकलेच असेल व २० जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच,

• पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, ही अपेक्षा.

• पोलीस दलातील एक तपास अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी आढळली. त्या गाडीत जिलेटिनच्या वीस कांड्या होत्या. त्यामुळे खळबळ माजली.

• अंबानींचे नाव आल्यामुळे हे सर्व प्रकरण पोलिसांनी फारच मनावर घेतले. हे सर्व का झाले, कसे झाले यावर चर्चा सुरू झाल्या, पण काही दिवसांतच या गाडीचा मालक मनमुख हिरेन याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडल्याने अंबानी यांच्या घरासमोर न फुटलेल्या जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला आहे.

• विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी विधानसभेत हे प्रकरण लावून धरले. सरकारने वाझे यांची बदली करून संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे दिला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच केंद्र सरकारने ‘एनआयए’ ला तपासाला पाठवले. त्याची इतक्या तातडीने गरज नव्हती, पण महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणात नाक खुपसायला मिळते म्हटल्यावर केंद्रीय तपास यंत्रणा मागे कशा राहतील?

• वीस जिलेटिन कांड्यांचा व गाडी मालकाच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएने हाती घेऊन लगेच वाझे यांना अटक करण्याची कर्तबगारी दाखवून दिली. वाझे यांच्या अटकेने भारतीय जनता पक्षात जे आनंदाचे भरते आले आहे त्याचे वर्णन करण्यास शब्दच अपुरे पडावेत. “वाझे यांना अटक झाली हो।।” असे गर्जत हे लोक रस्त्यावर यायचेच काय ते बाकी आहेत.

• या आनंदाचे कारण असे की, काही महिन्यांपूर्वी याच वाझे यांनी रायगड पोलिसांच्या मदतीने भाजपवाल्यांचा महंत अर्णब गोस्वामी यास अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी बेड्या ठोकल्या होत्या. त्या वेळी हे सर्व लोक गोस्वामी याच्या नावाने रडत होते व वाझे यांना शाप देत होते. “थांबा, बघून घेऊ, केंद्रात आमचीच सत्ता आहे”, असे सांगत होते.

• तो मोका आता साधला असून २० जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणात वाझे यांना केंद्रीय पथकाने अटक केली आहे. वाझे यांची अटक कायदेशीर की बेकायदेशीर, या चर्चेला आता अर्थ नाही.

• विरोधकांची सरकारे अस्थिर किंवा बदनाम करण्यासाठी कोणत्याही थराला जायचे, बनावट प्रकरणे निर्माण करायची, राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करायचे हे प्रकार सध्या सर्रास चालले आहेत.

• सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी उत्तम तपास केला, तरीही केंद्राने सीबीआयला घुसवले. त्या सीबीआयने तरी काय दिवे लावले? हात चोळत बसले.

• कंगना राणावत या बेताल नटीने बेकायदेशीर कृत्ये केली असतानाही केंद्र सरकार व भाजपवाले तिच्या समर्थनासाठी उभे राहिले. आता २० जिलेटिन कांड्यांचे प्रकरण राज्याचे दहशतवादविरोधी पथक तपासत असतानाच ‘एनआयए’ने त्यात उडी मारली.

• अर्णब गोस्वामीस अटक करून त्यास तुरुंगात टाकल्यापासून वाझे हे भाजप आणि केंद्राच्या हिटलिस्टवर होतेच. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंतही केंद्रीय पथकाची थांबायची तयारी नव्हती. २० जिलेटिनच्या कांड्या सापडण्यासारखे प्रकार देशभरात रोजच घडत आहेत. कश्मीर खोऱ्यात आजही स्फोटकांचे साठे सापडत आहेत, पण हे एनआयएचे पथक तिकडे गेले काय?

• पुलवामात स्फोटकांचा साठा नक्की कोणत्या फटीतून आत घुसवला व त्या स्फोटांत आपल्या चाळीस जवानांचे कसे बळी गेले, हे आजही गौडबंगालच आहे! बिहार- नेपाळ सीमेवर हत्यारांची, स्फोटकांची आवक – जावक सुरूच असते. मणिपूर म्यानमार सीमेवरील स्थिती अशा बाबतीत गंभीरच असते.

• नक्षलग्रस्त भागात तर बंदुका, स्फोटकांचे कारखानेच निर्माण झाले असून तेथे देशविरोधी कट – कारस्थाने सुरू आहेत, पण तुमचे जे जिलेटिन छाप एनआयए की काय आहे, ते त्या स्फोटकांचा वास घ्यायला गेले नाही. केंद्राला तशी गरजच वाटत नसावी.

• महाराष्ट्रात काही खुट्ट झाले की, या केंद्रीय यंत्रणा लगेच महाराष्ट्रात धाव घेतात. अलीकडे हे जणू केंद्र सरकारचे धोरणच झालेले दिसते. अंबानी हे आपल्या देशातील बड़े प्रस्थ आहेत. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही खोट असता कामाच नये. म्हणूनच त्यांच्या घराच्या परिसरात सापडलेल्या २० जिलेटिनच्या कांड्या व त्यानंतर झालेला मनसुख हिरेनचा मृत्यू हे दोन्ही प्रकार गंभीरच आहेत, पण म्हणून या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना जमणार नाही हे केंद्र सरकार परस्पर कसे काय ठरवू शकते ?

• मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपींना फासावर लटकविणारे जसे मुंबईचे पोलीस आहेत तसे २६ / ११ ‘च्या दहशतवादी हल्ल्यातील कसाबसारख्यांना प्राणाची बाजी लावून पकडणारे व फासावर लटकवणारेही मुंबई महाराष्ट्राचेच पोलीस दल आहे.

• महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता व शौर्य याची वाहवा जगभरात असताना २० जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे, हे आश्चर्यच आहे. अर्थात, आता यानिमित्ताने एक स्पष्ट झाले, ‘एनआयएचे असे येणे हे मागचा हिशेब चुकता करण्यासाठीच होते.

• वाझे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भंपक गोस्वामीला पकडले, त्याचा टीआरपी घोटाळा उघड केला. त्या बदल्यात केंद्राने वाझे यांना पकडून दाखवले. इथेच ही केस फाईल बंद होते.

• वाझे यांचे काही चुकलेच असेल व २० जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते.

• त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, ही अपेक्षा.


Tags: arnab goswamidevendra fadnavissaamana newssachin vazesanjay rautअर्णब गोस्वामीकेंद्र सरकारसचिन वाझेसंजय राऊत
Previous Post

भारत डायनेमिक्स लिमिटेडमध्ये ७० जागांसाठी भरती

Next Post

#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post
Good news

#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!