Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सामनाचा हल्लाबोल: “महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे, लाखो रोजगार हिरावणारे राज ठाकरेंचे मित्रच! शिंदे म्हणजे खापरफोडे!!”

September 15, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
saamana editorial

मुक्तपीठ टीम

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरून राजकीय वाद रंगला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे ठेवले पाहिजे अशी टिपण्णी केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. “मनसेप्रमुख श्री राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत, असे सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे, असा सूचक इशाराही देण्यात आला आहे.

१ लाख लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प गुजरातला वळवला!!

  • महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे.
  • तरीही वेदांता-फॉक्सकॉन हा मोठा औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून खेचून गुजरातला नेल्याचे वृत्त धक्कादायक आहे.
  • पुण्याच्या तळेगावजवळ ११०० एकर जमीन व इतर सवलती या उद्योगास देण्याचे महाविकास आघाडी सरकारने मान्यच केले होते.
  • हा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल असे कंपनीचे पक्के वचन होते.
  • जूनपर्यंत तरी कंपनीचे मन बदलले नव्हते, पण महाराष्ट्रात एक बेकायदा सरकार विराजमान होताच किमान १ लाख लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प गुजरातला वळवला गेला आहे.
  • महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवर हा खूप मोठा हल्ला आहे.

‘लूटमार’ पद्धतीने गुजरातने महाराष्ट्रातला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पळवून नेला!!

  • मुख्यमंत्री शिंदे यांचा नुकताच पैठण दौरा झाला.
  • त्यांच्या गटाचे आमदार भुमरे यांचा हट्ट पुरविण्यासाठी मुख्यमंत्री पैठण यात्रेस गेले.
  • तेथे एका मंडपात मुख्यमंत्र्यांची पेढे व लाडवांची तुला करण्याची योजना होती. त्यासाठी अनेक खोके भरून मिठाई तेथे आणली होती.
  • शिंदे गटाचा खोक्यांशी संबंध जोडला जात असला तरी खोक्यातली मिठाई -पाहून ‘तुला’ करण्याचे मुख्यमंत्र्यांनी नाकारले.
  • त्यांनी मिठाईतुला नाकारताच त्या मांडवात जमलेल्या लोकांनी लाडू पेढ्यांची अक्षरशः लूटमार केली.
  • लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या डोळयांसमोर लाडू-पेढे पळवून नेले.
  • अगदी त्याच ‘लूटमार’ पद्धतीने गुजरातने महाराष्ट्रातला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प पळवून नेला आहे.
  • याआधी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातने असेच पळवून नेले.
  • आता फॉक्सकॉन हातचे गेले.

एकनाथ शिंदेंना सामनातून सुनावले!!

  • फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला याचे खापर मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडले.
  • काय तर म्हणे, या प्रकल्पास दोन वर्षात प्रतिसाद मिळाला नसेल.
  • मग हे महाशय गेले दोनेक वर्षे त्याच सरकारचे महत्त्वाचे मंत्री होते.
  • मग दोन वर्षे काय फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे व्यस्त होते?
  • इतक्या मोठ्या प्रकल्पाविषयी दिरंगाई होत आहे याविषयी त्यांनी तोंडातून ‘ब्र’ काढल्याची नोंद कोणत्याही कॅबिनेट बैठकीत नाही.
    आमचा तर आरोप नव्हे, तर खात्रीच आहे.

मनसेला सूचक इशारा!!

  • फडणवीस यांनी त्यांच्या काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून उचलून गुजरातच्या हवाली केले तसे मुख्यमंत्री शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या हातावर उदक सोडावे तसा सोडला.
  • उद्या हे याच पद्धतीने मुंबईचादेखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत.
  • फॉक्सकॉन ही तर सुरुवात आहे.
  • ‘आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले.
  • तुमच्या आमदारांना पाच-सहाशे खोके दिले.
  • त्या बदल्यात मुंबई-महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती द्या’, असा हा सरळ सरळ सौदा दिसतो.
  • मनसेप्रमुख श्री. राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत.
  • महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील.
  • हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे.

जर शिवसेना नसती तर आजचे मुख्यमंत्री तरी कुठे असते?

  • मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व राहू नये यासाठीच भाजपने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केला.
  • मुख्यमंत्री शिंदे यांनी पैठणच्या भाडोत्री सभेत वल्गना केली की, शिवसेनेने मराठी माणसाचे नुकसान केले.
  • अर्थात मुंबईतून मराठी माणूस कमी का झाला, या प्रश्नाचे उत्तर आता त्यांनीच दिले आहे.
  • वेदांता – फॉक्सकॉनसारखे प्रकल्प मुंबई, महाराष्ट्रातून खेचून नेले जात असताना मुख्यमंत्री दाढीची खुंट उपटत बसल्यानेच मराठी माणसाचे नुकसान झाले आहे.
  • शिवसेनेवर खापर फोडणाऱ्यांनी मुळात हा विचार केला पाहिजे की, जर शिवसेना नसती तर आजचे मुख्यमंत्री तरी कुठे असते?
  • पण माणसं एकदा बेइमानीच्या उताराला लागली की त्यांना सावरणे कठीण असते.
  • मुख्यमंत्री शिंदे यांची गाडी त्याच बेइमानीच्या उताराला लागली आहे.
  • त्यांचा अधःपात आता अटळ आहे.
  • सुरत व गुवाहाटी येथे बेइमान आमदार गटास शिंदे सांगत होते, “घाबरू नका.
  • आपल्यापाठी एक महाशक्ती आहे.
  • आता आपल्याला हवे ते मिळेल!”
  • शाब्बास शिंदे! तुम्हाला हवे ते मिळाले; पण महाराष्ट्रातील लाखभर तरुणांच्या तोंडचा घास आणि रोजगार मात्र तुमच्या त्या बकासुरी महाशक्तीने ओरबाडून नेला.
  • त्याचे खापर आधीच्या सरकारवर फोडून तुम्ही तुमच्या अकलेची दिवाळखोरी जाहीर केली आहे.

हिंदूंचे देव आणि संत या सरकारला कदापि आशीर्वाद देणार नाहीत…

  • उद्या हे महाराष्ट्रातील जनावरांत पसरत असलेल्या ‘लम्पी’ आजाराचे खापरही आघाडी सरकारवर फोडतील.
  • स्वतःच्या घरी पाळणा हलत नाही, मग ज्यांच्या घरी हलतोय त्यांच्या नावाने बोटे मोडायची किंवा जादूटोणा करायचा अशा वृत्तीची अवलाद महाराष्ट्राच्या नशिबी यावी हे दुर्भाग्य नाही तर काय?
  • आज एक लाख नोकऱ्या देणारा वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प या लोकांनी दुसऱ्या राज्यात जाऊ दिला.
  • पाठोपाठ महाविकास आघाडी सरकारने कसोशीने पाठपुरावा केलेला ‘बल्क ड्रग पार्क’ हा आणखी एक मोठा प्रकल्पही महाराष्ट्राने गमावला आहे.
  • महाराष्ट्रात येऊ घातलेला हा प्रकल्प आता गुजरातसह आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये उभारला जाणार आहे.
  • ‘आणखी असे किती उद्योग महाराष्ट्रातून इतर राज्यांत जातील हे सध्याचे ‘ईडी’ सरकार आणि त्यांच्या त्या ‘महाशक्ती’लाच माहीत.
  • त्यांच्या मनात आणखी काय काय सुरू आहे ते एखाद्या अघोरी बाबा-बुवालाच माहीत.
  • कारण हिंदूंचे देव आणि संत या सरकारला कदापि आशीर्वाद देणार नाहीत.

शिंदे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे ठेवावे…

  • वेदांता – ‘फॉक्सकॉन’ची लूट शिवसेनेने उघड केली नसती तर हा घास पचवून त्यांनी आणखी काही गिळले असते.
  • त्यांना ‘फॉक्सकॉन’ प्रमाणे मुंबई-ठाणे जिंकायचे आहे.
  • त्यांना महाराष्ट्रातला शेती उद्योग खतम करायचा आहे.
  • त्यांना महाराष्ट्राचे वैभव, लौकिक नष्ट करून महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे करायचे आहे.
  • शिंदे गटाच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीने महाराष्ट्राशी उभा दावा मांडला आहे.
  • शिंदे मात्र सर्व खापर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर फोडून स्वतःचे अपयश झाकत आहेत.
  • शिंदे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे असेच ठेवायला हवे.
  • महाराष्ट्राने डोळे उघडे ठेवून पावले टाकायला हवीत!

Tags: Foxconn VedantaMaharashtramnsRaj ThackeraysaamanaShivsenaमनसेमहाराष्ट्रराज ठाकरेवेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पशिवसेनासामना
Previous Post

राज्यातील २२ जिल्ह्यातील बाधित गाव परिसरात सात लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण – सचिंद्र प्रताप सिंह

Next Post

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी

Next Post
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी 1

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!