Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

‘ईडी’ निवडून आरोपी बनवते! ‘सामना’ अग्रलेखात भाजपा, फायनान्सर बिल्डर्स लक्ष्य! न्यायालयाचं कौतुक!

November 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Saamana Editorial on How ed works on the direction of BJP

मुक्तपीठ टीम

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून भाजपा, फायनान्सर बिल्डर्स यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ईडीमार्फत एखाद्याला ठरवून टार्गेट केलं जातं किंवा अटक केली जाते, असा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे. तसेच ईडीने स्वतःच आरोपींची निवड करीत अटक केली हे न्यायालयाचे निरीक्षण अनेकांचे मुखवटे फाडणारे आहे, असे म्हणत न्यायालयाचं कौतुकही केलं आहे.

मानवी अधिकारांचे, स्वातंत्र्याचे हे सरळ हनन !!

  • सध्याचे केंद्रीय सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे, यावर मुंबईतील विशेष न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
  • गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील घोटाळ्याचा ठपका ठेवून शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांना ‘ईडी’ने केलेली अटक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी बेकायदेशीर ठरवली आहे.
  • आपल्या देशात एका ज्येष्ठ संसद सदस्याला बेकायदेशीरपणे अटक करून १०० दिवस तुरुंगात डांबले जात असेल तर कायद्याचे आणि न्यायाचे राज्य देशात नाही.
  • मानवी अधिकारांचे, स्वातंत्र्याचे हे सरळ हनन आहे.
  • जगातील अनेक देशांत तेथील हुकूमशहा विरोधकांना बंदुकीच्या बळावर खतम करतात.
  • कोणतेही खटले न चालवता तुरुंगात डांबतात फासावर लटकवतात.
  • आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेने हे कार्य ‘ईडी’ नामक संघटनेकडे सोपवले आहे.
  • न्या. देशपांडे यांनी संजय राऊत व प्रवीण राऊत प्रकरणात या व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत.

ही श्रद्धा आज किती न्यायमूर्तींच्या मनात आहे?

  • पत्राचाळ प्रकरणात घोटाळा झाला व त्यातली पन्नासेक लाखांची रक्कम राऊत यांच्या खात्यात जमा झाली.
  • हे सर्व पैसे प्रवीण राऊत यांच्याकडून मिळाले असा आरोप करीत पन्नास लाखांचे हे प्रकरण ‘ईडी’ने मनी लॉण्डरिंग स्वरूपाचे ठरवून आधी प्रवीण राऊत यांना अटक केली, नंतर संजय राऊत यांच्यावर धाडी घालून त्यांनाही अटक केली.
  • १०० दिवस तुरुंगात डांबले.
  • सरकारने एखाद्या नागरिकाविरुद्ध कारवाई केली असेल तर तिला कायद्याचा आधार असला पाहिजे असे ब्रिटिश राजवटीतही न्यायालये पाहत असत.
  • लोकांच्या स्थानबद्धतेची पिंवा भाषण स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य यांसारख्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने घालणारी प्रकरणे त्यावेळीही न्यायालय तपासत असे.
  • आज कायदा कमकुवत व न्यायव्यवस्था दबावाखाली असल्याचे दिसत असताना एका न्यायमूर्तीने निर्भयपणे ‘न्यायदान’ करण्याचे प्रकरण दुर्मिळच म्हणावे लागेल.
  • देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी न्यायमंदिराच्या पायरीवर डोके टेकले.
  • त्यांच्यासाठी ते मंदिरच आहे, पण ही श्रद्धा आज किती न्यायमूर्तींच्या मनात आहे?

हे सर्व प्रकरण म्हणजे राजकीय कारस्थानाचे कुभांड…

  • संजय राऊत यांना चौकशीआधीच फासावर लटकविण्याचा प्रयत्न झाला व असे फाशीचे दोर सध्या फक्त राजकीय विरोधकांसाठीच वळले जात आहेत.
  • महाराष्ट्रातील ‘ईडी’ची अनेक प्रकरणे यास साक्ष आहेत.
  • राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचे सहकारी एक वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात आहेत.
  • हे सर्व प्रकरण म्हणजे राजकीय कारस्थानाचे कुभांड आहे.
  • १०० कोटींची वसुली मुंबई-ठाण्यातील बार मालकांकडून करण्याची सूचना एका फौजदार स्वरूपाच्या पोलीस अधिकाऱ्यांस राज्याचा गृहमंत्री देऊ शकतो काय?
  • पण जो अधिकारी स्वतःच मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याच्या गुह्यातील आरोपी आहे, ज्याने या प्रकरणातला पुरावा नष्ट
  • करण्यासाठी आपल्या मित्राची हत्या घडवून आणली, त्याच्या साक्षीवर विसंबून देशमुखांविरुद्धचा खटला ईडी आणि सीबीआयने उभा केला.
  • न्यायायाने तब्बल एक वर्षांने देशमुखांना जामीन मंजूर करताना फौजदार सचिन वाझेच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही असे सांगितले, पण सीबीआयच्या सत्र न्यायालयाने मात्र त्याच साक्षीदारांवर भरवसा ठेवून देशमुख यांना जामीन नाकारला.
  • हा आपल्या न्यायव्यवस्थेतील गोंधळ आहे की दबाव?
  • गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात असे अनेक बनावट खटले केंद्राच्या तपास यंत्रणांनी उभे केले व निरपराध लोकांना तुरुंगात सडवले.
  • पुरावे नाहीत व खटलेही चालत नाहीत, पण विशेष न्यायालये तारखांवर तारखा देत आहेत.
  • या सगळ्यांना छेद देणारा निर्णय न्या. एम. जी. देशपांडे यांच्या विशेष न्यायालयाने दिला.

ईडीने स्वतःच आरोपींची निवड करीत अटक केली!!

  • एखाद्याला ठरवून ‘टार्गेट’ किंवा ‘अटक’ करण्याचे काम ईडी करत आहे.
  • प्रवीण राऊत यांचे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असताना त्यास मनी लॉण्डरिंगचे स्वरूप दिले व संजय राऊत यांना नाहक अटक केली, या प्रकरणातील मुख्य आरोपींना ‘ईडी’ने अटक केली नाही.
  • म्हणजे ईडीने स्वतःच आरोपींची निवड करीत अटक केली हे न्यायालयाचे निरीक्षण अनेकांचे मुखवटे फाडणारे आहे.
  • विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार ‘ईडी’, सीबीआयचा गैरवापर करीत आहे.
  • अशा कोणत्याही यंत्रणेची नोटीस विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच का दिली जाते आणि त्यांनाच अटक का केली जाते? असा सवाल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला.
  • प. बंगालच्या मुख्यमंत्रीही तेच सांगतात व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेच सांगितले.
  • रांची येथे ‘ईडी’ने छापेमारीसाठी भाजपच्या मालकीच्या गाड्या वापरल्याचे उघड झाले.
  • महाराष्ट्रात शिवसेना पडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’चा वापर झाला.
  • ‘ईडी’ ज्यांना आधी अटक करणार होती त्यांनी शिवसेना सोडताच त्यांना क्लीन चिट देण्यात आली व जे शिंदे-फडणवीस यांच्यासमोर झुकले नाहीत ते ‘ईडी-सीबीआय’चे अपराधी ठरले.

विशेष न्यायालयाचे निकालपत्र ऐतिहासिक व मार्गदर्शक!!!

  • देशात कायद्याचे राज्य नाही.
  • न्याययंत्रणेवर दबाव आहे व केंद्रीय यंत्रणा गुलाम बनल्या आहेत.
  • संजय राऊत प्रकरणात हे उघड झाले.
  • विशेष न्यायालयाने हे सर्व परखडपणे समोर आणले.
  • मुंबई-महाराष्ट्रातील भाजपचे किमान ७ मंत्री, १५ आमदार-खासदार, भाजपास अर्थपुरवठा करणारे बिल्डर्स ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणात आत जातील असे गुन्हे त्यांच्या नावावर आहेत, पण ‘ईडी’ स्वतःच आरोपींची निवड करते हे न्यायालयाचे म्हणणे अशावेळी सत्य ठरते.
  • विशेष न्यायालयाचे निर्भय न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांचे निकालपत्र ऐतिहासिक व मार्गदर्शक आहे.
  • न्या. देशपांडे यांचे निकालपत्र व निरीक्षणे तेजस्वी प्रकाश किरणांसारखी आहेत.
  • सध्याच्या न्यायव्यवस्थेतील अंधकार दूर करणाऱ्या निकालांचे स्वागत देशभरात झाले ते यामुळेच.
  • तुरुंगात खितपत पडलेल्या अनेकांना यामुळे प्रकाश दिसेल अशी आशा करूया.

Tags: BJPEDMumbai Special CourtPatrachawl Scamsaamana editorialsanjay rautShivsenaईडीपत्राचाळ घोटाळाभाजपामुंबई विशेष न्यायालयशिवसेनासंजय राऊतसामना
Previous Post

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात टेक्निकल क्षेत्रात मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती

Next Post

गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार- बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे  

Next Post
Ports and Mines Minister Dadaji Bhuse

गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार- बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!