मुक्तपीठ टीम
ट्विटर-फेसबुक, मायक्रॉसॉफ्टनंतर आता अॅमेझॉननेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. एकामागून एक सर्व टेक कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या कंपन्यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे, पण या टेक कंपन्याना नेमकं काय झाले आहे? कर्मचारी कपात का केली जात आहे? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
कोणत्या कंपन्यांनी किती कर्मचारी कपात केली?
- एलॉन मस्क ट्विटरचे मालक होताच आतापर्यंत सुमारे ३ हजार ७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
- मायक्रोसॉफ्टने आतापर्यंत सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
- स्नॅपने आपल्या २०% कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
- मेटाने सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
- अॅमेझॉन लवकरच सुमारे १० हजार कर्मचार्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे.
- एवढेच नाही तर इंटेल लवकरच आपल्या कंपनीतील २०% कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.
- भारतीय टेक कंपनी बायजूनेही काही काळापूर्वी अडीच हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.
- याशिवाय Booking.com, Lyft, iRobot, Peloton, Salesforce आणि Stripe सारख्या कंपन्याही लवकरच त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत.
नेमकं कारण काय आहे?
- कंपन्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यामागे जागतिक आर्थिक मंदीचे कारण सांगितले जात आहे.
- कोरोनाच्या काळात या कंपन्यांची वाढ तुलनेने मंदावली आहे.
- अशा परिस्थितीत कंपन्यांना या नोकऱ्या कपातीद्वारे खर्च कमी करून नफा वाढवायचा आहे.
भरती प्रक्रियाही मंदावली
- या मोठ्या टेक कंपन्यांनी केवळ आपल्या कर्मचाऱ्यांनाच काढून टाकले नाही, तर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रियाही मंदावली आहे.