मुक्तपीठ टीम
आपल्या ऋतुराज गायकवाडनं या आयपीएलमध्ये धमाल कामगिरी बजावली. चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणाऱ्या या युवा ओपनर बॅट्समनसाठी आयपीएल २०२१ चे सीझन सर्वोत्तम होते. त्याने या सीझनमध्ये आपल्या संघासाठी भरपूर रन घेतले. अंतिम सामन्यात त्याने २७ चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ३२ धावांची खेळी खेळली. त्याच्या डावाच्या बळावर त्याने या सीझनमधील ऑरेंज कॅप जिंकली. सर्वात कमी वयात ऑरेंज कॅप जिंकणारा तो या लीगमधील पहिला खेळाडू ठरला. त्याने अवघ्या २४ व्या वर्षी हा पराक्रम केला.
ऋतुराजची सर्वोत्तम खेळी
- कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऋतुराज गायकवाडने या सीझनमधील सर्वाधिक धावा केल्या.
- ऋतुराजने या सीझनच्या १६ सामन्यांत ४५.३५ च्या सरासरीने ६३५ धावा केल्या.
- या सिझनमध्ये त्याने एक शतक आणि चार अर्धशतके देखील केली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १०१ होती.
- त्याने या सीझनमध्ये ६४ चौकार आणि २३ षटकार मारले.
आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज-
१. ऋतुराज गायकवाड – ६३५ धावा
२. फाफ डुप्लेसिस – ६३३ धावा
३. केएल राहुल – ६२६ धावा
४. शिखर धवन – ५८७ धावा
५. ग्लेन मॅक्सवेल – ५१३ धावा
आजवर कोणी पटकावली ऑरेंज कॅप
- २००८ : शान मार्श
- २००९ : मॅथ्यू हेडन
- २०१०: सचिन तेंडुलकर
- २०११: ख्रिस गेल
- २०१२ : ख्रिस गेल
- २०१३ : माईक हसी
- २०१४ : रॉबिन उथप्पा
- २०१५ : डेव्हिड वॉर्नर
- २०१६ : विराट कोहली
- २०१७ : डेव्हिड वॉर्नर
- २०१८ : केन विल्यमसन
- २०१९ : डेव्हिड वॉर्नर
- २०२० : केएल राहुल
- २०२१ : ऋतुराज गायकवाड
ऑरेंज कॅप जिंकणारे भारतीय फलंदाज
- २०१० – सचिन तेंडुलकर
- २०१४ – रॉबिन उथप्पा
- २०१६ – विराट कोहली
- २०२०- केएल राहुल
- २०२१ – ऋतुराज गायकवाड