मुक्तपीठ टीम
रशिया युक्रेन युद्धाला नऊ महिने उलटून गेले. २० फेब्रुवारी २०२२ रोजी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार रशियन सैन्याने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केले होते. रशियाला काही दिवसांत युक्रेनचा ताबा घ्यायचा होता, पण तरीही रशियाला यश मिळालेले नाही. युक्रेनमधील युद्धात मोठ्या संख्येने लोक मारले गेले आहेत आणि जखमी झाले आहेत. पण तरीही युक्रेनचे सैन्य ठामपणे रशियन सैन्याला तोंड देत आहे. आता रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सध्याची परिस्थिती पाहता रशियन कैद्यांना मोठा इशारा दिला आहे. हा इशारा नेमका काय आहे? जाणून घेवूया…
युक्रेनशी लढा किंवा शिक्षा भोगा!
- रशियन सैनिकांचे इतके दिवस रणांगणावर राहिल्यामुळे मनोधैर्य खचले आहे.
- या युद्धात आतापर्यंत अनेक रशियन सैनिक मारले गेलेत.
- अनेक सैनिकांना युक्रेनच्या लष्कराने कैद केले आहे.
- सैनिकांच्या पत्नीही त्यांच्या पतींना युद्धातून घरी परतण्यासाठी सरकारला विरोध करत आहेत.
- व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या तुरुंगातील कैद्यांना युद्धात लढण्यासाठी सोडत आहेत.
- पुतिन यांनी या सर्व कैद्यांना एकतर युक्रेनशी लढा अन्यथा शिक्षेला सामोरे जा, असा इशारा दिला आहे.
युद्धात सामील व्हा…
- रशियन सैनिक युद्धक्षेत्रात हळूहळू कमी होत आहेत.
- अनेक जवानांचे मनोधैर्य कमी होत आहे.
- पुतिन यांचा त्यांच्या देशातील कैद्यांना युद्धात लढण्यासाठी आग्रह आहे.
- युद्धकैद्यांची सुटका होईल, पण जो कैदी याला नकार देईल त्याची शिक्षा वाढवली जाऊ शकते.