Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँकांची आरटीजीएस सेवा राहणार १४ तास बंद…कधी, का? काय करायचं?

April 15, 2021
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
RBI

मुक्तपीठ टीम

 

बँकेतून मोठी रक्कम ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या शनिवारच्या मध्य रात्रीपासून रविवार, १८ एप्रिल दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल १४ तास रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस सेवा बंद असणार आहे. मात्र यादरम्यान, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) ही सेवा सुरळीतपणे सुरु राहणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंबंधित माहिती दिली आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिलला सर्व कामकाज संपल्यानंतर आरटीजीएस सिस्टिमच्या क्षमतेला सुधारण्यासाठी आणि ‘डिजास्टर रिकव्हरी टाईम’ला सुलभ करण्यासाठी ही सेवा १४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र आरटीजीएस सेवा बंद असली तरी ग्राहकांना एनईएफटी सेवेचा लाभ घेता येणार आहे.

आरटीजीएस सेवा आहे तरी काय?

  • भारतात २६ मार्च २००४ रोजी आरटीजीएस सेवेला सुरुवात झाली होती.
  • रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस सेवा ही पैसे ट्रान्सफर करण्याची सर्वात वेगवान सेवा आहे.
  • आरटीजीएस सेवेचा उपयोग मोठ्या रक्कमेसाठी म्हणजे २ लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम पाठवण्यासाठी केला जातो.
  • जर काही कारणास्तव दुसऱ्या खात्यात पैसे पोचले नाहीत तर सर्व रक्कम आपल्या खात्यात परत पाठवली जाते.
  • या सेवेचा वापर कोणताही खातेधारक करू शकतो.

कसा करतात वापर?

  • सर्वसाधारणपणे बँकेतून पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया खूप वेळखावू आहे.
  • पण विनाविलंब पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आरटीजीएस सेवाचा ग्राहक वापर करु शकतात.
  • आरटीजीएसचा पर्याय निवडल्यास बेनिफिशरीचे (Beneficiary) बँक डिटेल अॅड करून जितकी रक्कम पाठवायची आहे तितकी रक्कम भरुन सबमिट केल्यास काही क्षणात पैसे ट्रान्सफर होतात.
  • ही डिजिटल सेवा असल्यामुळे बँकेत जाण्याची गरज भासत नाही घर बसल्या आर्थिक व्यवहार सुलभपणे केला जातो.

Tags: NEFTRTGSआरबीआयभारतीय रिझर्व्ह बँक
Previous Post

“उद्योग विश्वाने निर्बंधांचे तंतोतंत पालन करावेः” सुभाष देसाई

Next Post

दिवसभरात ६१ हजार नवे रुग्ण, ५३ हजार बरेही! ४८ तासात २११ मृत्यू!

Next Post
MCR 15-4-21

दिवसभरात ६१ हजार नवे रुग्ण, ५३ हजार बरेही! ४८ तासात २११ मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!