मुक्तपीठ टीम
२०१४पासून सतत सर्वाधिक लोकप्रिय राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेले काही दिवस लोकल ते ग्लोबल टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातही महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये स्थानिक नेत्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे सर्वेक्षणांमधून उघड होत आहे. त्याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्लीत एका चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे. सरसंघचालकांसह संघाचे मुख्य पदाधिकारी आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होण्याची शक्यता आहे.
संघाच्या चिंतन बैठकीतील अपेक्षित विषय
• कोरोना महामारीला हाताळण्यातून भाजपाने सरकार म्हणून गमावलेली विश्वसनीयता
• शेतकरी आंदोलनामुळे भाजपाला झालेले नुकसान, त्यावर तोडगा.
• केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, नव्यांचा समावेश मोदी सरकारची प्रतिमा संवर्धनावर चर्चा.
• उत्तरप्रदेशातील सध्याची परिस्थिती. पंचायत निवडणुकीतील भाजपा पराभवाचे विश्लेषण. राज्याच्या नेत्यांमधील असंतोष.
• बंगाल निवडणुकीतील पराभव. त्यानंतर तेथे उफाळलेला हिंसाचार. तेथे भविष्यातील वाटचालीसाठी कसे विचार युद्ध लढायचे?
सध्या मोदी सरकारवर चहुबाजूने हल्ले होते आहेत. त्यामुळे तडा जात असलेल्या सरकारच्या प्रतिमेला सावरण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कंबर कसली आहे. याआधी उत्तरप्रदेशात अशीच एक राज्यसत्रीय बैठक झाली होती. त्यानंतर आता संघाने शनिवारी दिल्लीत एक बैठक आयोजित केली आहे.
संघाच्या चिंतन बैठकीत कोण असणार?
• सरसंघचालक डॉ.मोहन भागवत
• सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबाळे
• सहसरकार्यवाह कृष्णा गोपाळ
• सहसरकार्यवाह सुरेश सोनी
• भाजपाचे केंद्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष
• भाजपाचे प्रमुख नेतेही या बैठकीत सहभागही होणार असल्याची शक्यता आहे.