मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसात स्वत:ला हिंदू धर्मगुरू म्हणवणाऱ्या कालिचरण महाराजसारख्या काहींकडून झालेल्या घृणास्पद वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. धर्मसंसद नावाने आयोजित कार्यक्रमांमधील द्वेष निर्माण करणाऱ्या अशा वक्तव्यांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “धर्मसंसदेच्या कार्यक्रमात केलेली अपमानास्पद विधाने हिंदू विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तेथे जे मांडलं गेलं ते हिंदू शब्द, हिंदू कृत्य किंवा हिंदूचं डोकं नव्हतं, असं मांडतानाच “ते हिंदुत्व नाहीच,” असंही त्यांनी बजावलं आहे.
रविवारी मुंबईत ‘राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्व’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, मी कधी संतापाने काही बोललो तर ते हिंदुत्व आहे, असं नाही,” रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेचा संदर्भ देत संघप्रमुख म्हणाले की, संघ किंवा हिंदुत्वाचे अनुयायी यावर विश्वास ठेवत नाहीत.
भारत ‘हिंदू राष्ट्र’ होण्याच्या मार्गावर आहे का?
- भारत ‘हिंदू राष्ट्र’ होण्याच्या मार्गावर आहे का? या प्रश्नावर मोहन भागवत म्हणाले- हिंदु राष्ट्र बनवण्याबाबत हे नाही आहेत.
- कोणी मान्य करो वा न करो, ते हिंदू राष्ट्र आहे.
- आपल्या राज्यघटनेचे स्वरूप हिंदुत्व आहे.
- देशाच्या अखंडतेची भावनाही तशीच आहे.
- राष्ट्रीय अखंडतेसाठी सामाजिक समता कधीही आवश्यक नसते.
भिन्नतेचा अर्थ समजवला!
- भिन्नतेचा अर्थ वेगळे होणे नव्हे.
- संघाचा विश्वास लोकांमध्ये फूट पाडण्यात नसून त्यांच्यातील मतभेद दूर करण्यात आहे.
- यातून निर्माण झालेली एकजूट अधिक मजबूत होईल.
- आम्हाला हे काम हिंदुत्वाच्या माध्यमातून करायचे आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा अर्थ मांडला!
- संघप्रमुख म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू समाजाची एकता आणि संघटन याबद्दल सांगितले होते.
- भगवद्गीतेचा संदर्भ घेऊन त्यांनी या गोष्टी सांगितल्या होत्या.
- कुणालाही संपवण्याच्या किंवा हानी पोहोचवण्याच्या संदर्भात नाही.