मुक्तपीठ टीम
नवरेह महोत्सवात काश्मिरी पंडितांना संबोधित करताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले की,काश्मिरी पंडित लवकरच खोऱ्यात परततील. यावेळी ते म्हणाले, “मला वाटतं, तो दिवस अगदी जवळ आला आहे, जेव्हा काश्मिरी पंडित त्यांच्या घरी परत येतील आणि तो दिवस लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे. जम्मूमधील नवरेह उत्सवाच्या शेवटच्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काश्मिरी पंडितांना समुदायाला संबोधित केलं.
काश्मीर फाइल्सचे कौतुक करताना मोहन भागवत म्हणाले…
- द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे कौतुक करताना मोहन भागवत म्हणाले की, १९९०मध्ये काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून जावे लागले, यामागील वास्तवाबाबत देश आणि बाहेरही यामुळे जनजागृती झाली आहे, असे ते म्हणाले.
- कलम ३७० हटवल्याने पंडितांच्या काश्मीर खोऱ्यात परतण्याचा मार्ग मोकळा झाला.
- असे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे, जेथे तुम्हाला सुरक्षित वाटेल आणि तुमच्या शेजाऱ्यांसोबत पूर्वीप्रमाणे शांततेत राहाल आणि तुम्हाला तेथून कोणीही दूर करू शकणार नाही.
घरी परतण्याचा संकल्प पूर्ण करण्याची वेळ आलीय…
- ‘नवरेह’ या तीन दिवसीय उत्सवाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी काश्मिरी पंडित समुदायाला डिजिटल माध्यमाद्वारे संबोधित केले.
- ‘काश्मिर खोऱ्यात घरी परतण्याचा संकल्प पूर्ण करण्याची वेळ आली आहे.
- यासाठी खूप दिवस लागणार नाहीत.
- ते लवकरच प्रत्यक्षात येईल आणि या दिशेने आपल्याला प्रयत्न कायम ठेवावे लागतील.
- आपला इतिहास आणि आपले महान नेते आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक राहतील, प्रेरणा देत राहतील
आम्ही हार मानणार नाही आणि…
- २०११ मध्ये दिल्लीत काश्मिरी पंडितांचा हेराथ या उत्सवात सहभागी झाल्याचा उल्लेख करून या निमित्त काश्मीर पंडित समुदायाने त्यांच्या मातृभूमीत परतण्याची प्रतिज्ञा केली होती.
- प्रत्येकाच्या आयुष्यात आव्हाने येतात.
- तीन-दशकांपूर्वी आम्ही आमच्या देशात विस्थापित झालो.
- यावर उपाय काय? आम्ही झुकणार नाही आणि आमच्या घरी परत येऊन आमची प्रतिज्ञा पूर्ण झालेली पाहणार आहोत
मातृभूमी विसरू शकत नाही
- इस्रायलचा संदर्भ देत आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, ज्यू आपल्या मातृभूमीसाठी १८०० वर्षे लढले.
- ते म्हणाले की, १७०० वर्षात त्यांनी आपल्या प्रतिज्ञासाठी फारसे काही केले नाही, परंतु गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात इस्रायलने आपले ध्येय साध्य केले आणि जगातील आघाडीच्या देशांपैकी एक बनले.
- ते म्हणाले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असूनही आपण म्हणजेच काश्मिरी पंडितांना जगाच्या विविध भागात राहावे लागले आहे.
- आपण कुठेही राहू शकतो, पण आपल्या मातृभूमीला विसरू शकत नाही.