मुक्तपीठ टीम
अनेकदा काहींच्या राजकीय विरोध – समर्थन करणाऱ्या एकाच विषयावरील असंख्या ट्विट्समुळे विषय चर्चेत येतो. काहींना मिळणारा हजारोंचा प्रतिसाद चर्चेचा विषय बनतो. आता तसा प्रतिसाद हाही काहींकडून काहीवेळा खरेदी केला जातो की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. उत्तरप्रदेशातील माध्यमांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोशल मीडिया टीमचा एक कथित ऑडियो लीक चर्चेचा विषय ठरले आहे. सेवानिवृत्त आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी सोशल मीडियावर हा ऑडिओ शेअर केला आहे. त्यानुसार योगी आदित्यनाथांच्या समर्थनार्थ ट्विट करण्यासाठी एका ट्विटमागे दोन रुपये देण्याचा रेटही सांगितला जात आहे. या ऑडिओची सत्यता मुक्तपीठ किंवा अन्य कोणत्याही माध्यमाने प्रमाणित केलेली नाही. त्यामुळे सध्या तरी फक्त व्हायरल झाल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
व्हायरल झालेल्या कथित लीक ऑडिओमध्ये काय आहे?
पहिली व्यक्ती – मला सांगा, हे दोन रुपयांचे ट्विट कोठून प्राप्त झाले आहे?
दुसरी व्यक्ती – हे शंभरापेक्षा जास्त फॉलोवर असणाऱ्यांसाठी आहे.
पहिली व्यक्ती – बरं मला सांगा की हे कोणते हॅशटॅग असेल?
दुसरी व्यक्ती – आपण ग्रुपमध्ये पाहिल्यास तेथे हॅशटॅग आहे
पहिली व्यक्ती – योगीजींचा हॅशटॅग?
दुसरी व्यक्ती – होय…योगीजींचा हॅशटॅग
दुसरी व्यक्ती – काही अडचण आहे?
पहिली व्यक्ती – नाही .. आम्ही शक्य तितके करण्याचा प्रयत्न करीत आहोत, जेणेकरून थोडे वाढेल.
दुसरी व्यक्ती – त्यात थोडे पैसे बाकी आहेत. कारण २५ ट्वीट्स पाहिजे आहे. दुसरे म्हणजे हॅशटॅगबरोबर…योगींजीच्या बाजूने. म्हणजे योगीजींबद्दल चांगले लिहा.
पहिली व्यक्ती – कोणाचा ट्रेंड आहे?
दुसरी व्यक्ती – आपण हे सोडू नका. अतुलजीचा हा ट्रेंड आहे. गजेंद्र चौहान यांचा ट्रेंड आहे. एका आयडीवरून आपणास २५ ट्विटस मिळतील. आम्ही त्यांना पैसे देऊ.
पहिली व्यक्ती – ठिक आहे
दुसरी व्यक्ती – प्रत्येकाची लिंक ग्रुपमध्ये द्या. फोटोंसह. लवकर करा.
(येथे फोन कट झाला आहे.)
(हे ऑडिओ लिंक संभाषण प्रमाणित करण्यात आलेले नाही)
मनमोहन सिंहांवर कारवाई, भाजपाचा संबंध नसल्याचा दावा
• टूलकिट प्रकरणाचा हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आयटी टीमचे प्रमुख मनमोहन सिंह यांना काढून टाकण्यात आले आहे.
• मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आले नाही. त्याचवेळी या प्रकरणाचा भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा काही संबंध नसल्याचा दावा भाजपाने केला आहे.
• ही बाब खासगी कंपनी आणि त्याच्या कर्मचार्यांशी संबंधित आहे.
मनमोहन सिंह काय म्हणाले?
• मनमोहन सिंह यांची हकालपट्टी केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
• ‘हजारों जवाबों से अच्छी हमारी खामोशी न जाने कितने सवालों की आबरु रख लेगी’ असं सूचक ट्विट सिंह यांनी केलं आहे.