मुक्तपीठ टीम
येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर, या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत असून या पार्श्वभूमीवर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी रिपाइंचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता आणि रिपाइं चे उत्तर प्रदेश प्रभारी जवाहर उपस्थित होते.
आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश महत्वाचे राज्य आहे. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाला शह द्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टी ने रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन युती केली पाहिजे. उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे संघटन चांगले आहे. उत्तर प्रदेशात मूळ रिपब्लिकन पक्षाचा मतदार बहुजन समाज पक्षाने अपक्याकडे वळविला आहे. मात्र आता बहुजन समाज पक्षाकडे गेलेला रिपब्लिकन पक्षाचा मतदारवर्ग पुन्हा रिपब्लिकन पक्षाला आपल्याकडे घ्यायचा आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आरपीआय ला भाजप ने सोबत घ्यावे; भाजप आरपीआयची युती करावी तसेच अन्य राज्यांमध्ये आरपीआयचे युनिट मजबूत आहे. अन्य राज्यांमध्ये काही जागा भाजपने आरपीआयला देऊन युती करावी. भाजप हा आरपीआयचा पार्टनर आहे. भाजपसोबत राष्ट्रीय पातळीवर आरपीआय ची युती मजबूत आहे. मात्र प्रदेश स्तरावर विधानसभा निवडणुकीत आरपीआयला जागा देऊन युती करावी याबाबत रामदास आठवले यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या शी चर्चा केली.