कोल्हापूर / उदयराज वडामकर
कोल्हापूर मध्ये राॅयल रायडर्स आणि मोहिते रेसिंग अकॅडमी यांचे वतीने देशभरातील ५०० हुन अधिक स्पर्धकांच्या बाईकचा थरार. १६ ते १८ डिसेंबर या तीन दिवसासाठी भारतातील सर्वात मोठी व सुप्रसिद्ध असणाऱ्या “रॉयल रोडिओ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या मोटर बाईकचे एक्सपो प्रदर्शनही आयोजित केले.
एकूण ५०० हुन अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत आहेत.फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने स्पर्धा घेण्यात येत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये १६ डिसेंबर रोजी ऑटो क्रॉस, १७ डिसेंबर रोजी एमटीबी सायकल सुपर क्रॉस आणि १८ डिसेंबर रोजी मोटरसायकल सुपरक्राॅस रेसिंग अशा स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. या सर्व स्पर्धा हुपरी सांगवडे रोडजवळील मोहितेज रेसिंग अकॅडेमी यांच्या ट्रॅक वर होणार आहेत.
१६ रोजी होणारी मोटरसायकल आणि स्कूटर ऑटो क्रॉस स्पर्धा ही सकाळी सुरू होणार आहे.आणि यात ९ वेगवेगळ्या प्रकारातील स्पर्धा होणार आहेत. ८०० मीटरच्या ट्रॅक वर होणाऱ्या ही स्पर्धा असून मोटर सायकल, बाईक,स्कुटर(मोपेड)व प्रथमच ई व्हेईकल इलेक्ट्रॉनिक स्कूटर अशा गटामध्ये होणार आहे .बाईकच्या सीसी गटामध्ये ही स्पर्धा टाइमट्रायलवर पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेत एकूण १५० स्पर्धक सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या गो कारटिंग डांबरी ट्रॅकवर होणार आहेत.
१७ रोजी एम. टी. बी सुपर क्रॉस ही स्पर्धा होत आहे. भारतात केवळ आता ही स्पर्धा कोल्हापूर मध्ये सुपर क्रॉस ट्रॅकवर होत आहे.
देशभरातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत आहेत एकूण २०० स्पर्धकांचा सहभाग असणारी ही स्पर्धा एकूण पाच वयोगटात होत आहे. एकूण ९०० मीटर अंतराच्या ऑफ रोड ट्रॅकवर ही स्पर्धा होत आहे.
स्पर्धेचे वयोगट
- १४ वर्षाच्या आतील –
- १७ वर्षाच्या आतील –
- १८ ते ३० वयोगट –
- ३१ ते ४५ वयोगट –
- ४५ च्या वरील वयोगट .अशी ही स्पर्धा असणार आहे.
१८ डिसेंबर रोजी मोटरसायकल सुपर क्रॉस रेसिंगची स्पर्धा होणार आहे. वेगवेगळ्या २२ प्रकारच्या गटात ही स्पर्धा होणार असून बाईक मधील सर्व प्रकार यात असणार आहेत. स्पर्धेसाठी संपर्क हा जयदीप पोवार ९५०३६०९९९९,योगेश पाटील ७२७६३०८००८ आणि संदीप माने ९४२०८९१००२ साधायचा आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हा त्या त्या दिवशीच होणार आहे. स्पर्धा मोफत पाहता येणार असून या पाहण्यासाठी सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. आयोजक व संयोजक पत्रकार परिषदेला आदी उपस्थित होते.