मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. मंगळवारी राज्यात करोनाचे २१७२ नवे रुग्ण आढळल़े असून मुंबईत सर्वाधिक १३३३ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात गेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केला होता. तसेच ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रसारही वाढत आहे.तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, म्हणून नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाचे सर्व नियम पाळले पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे.
महाराष्ट्रात ओमिक्रोनचेही सर्वाधिक रुग्ण सापडले असून येत्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात कोरोनाने दोन हजाराच्या पार संख्या गाठली आहे. यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. देशासह राज्यात पुन्हा मोठी रुग्णवाढ होऊ लागल्यानं सर्व यंत्रणा पुन्हा अलर्ट मोडवर आल्या आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार देशासह, राज्याच्या डोक्यावरही कायम आहे.
१० दिवसांत पुन्हा विक्रमी रुग्णवाढ!
मागच्या १० दिवसांत महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने वाढला आहे. या दहा दिवसांतली आकडेवारी खालीलप्रमाणे –
- मंगळवार,२८ डिसेंबर २१ – २१७१ नवे कोरोना रुग्ण
- सोमवार, २७ डिसेंबर २१ – १४२६ नवे कोरोना रुग्ण
- रविवार,२६ डिसेंबर २१ – १६४८ नवे कोरोना रुग्ण
- शनिवार,२५ डिसेंबर २१ – १४८५ नवे कोरोना रुग्ण
- शुक्रवार, २४ डिसेंबर २१ – १४१० नवे कोरोना रुग्ण
- गुरुवार, २३ डिसेंबर २१ – १०७९ नवे कोरोना रुग्ण
- बुधवार, २२ डिसेंबर २१- १२०१ नवे कोरोना रुग्ण
- मंगळवार, २१ डिसेंबर २१- ८२५ नवे कोरोना रुग्ण
- सोमवार, २० डिसेंबर २१- ५४४ नवे कोरोना रुग्ण
- रविवार, १९ डिसेंबर २१-९०२ नवे कोरोना रुग्ण
१० दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या
- १७ डिसेंबर २१ – मुंबई मनपा २८९
- १९ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ३२१
- २० डिसेंबर २१ – मुंबई मनपा १९१
- २१ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ३१२
- २२ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ४८०
- २३ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ५७७
- २४ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ६७३
- २५ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ७३१
- २६ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ८९६
- २७ डिसेंबर २१ – मुंबई मनपा ७८८
- २८ डिसेंबर २१ – मुंबई मनपा १३३३
मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण
- मुंबईत मंगळवारी कोरोना रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे.
- मंगळवारी मुंबईतली आकडेवारी १३७७ आहे. सार्वजनिक ठिकाणी पुन्हा होणारी गर्दी आणि लोकांचा निष्काळजीपण यामुळे ही आकडेवारी एवढी वाढली आहे.
- राज्यात दिवसभरात २२ कोरोना रुग्णांचा मृत्युही झाल्याची माहिती समोर आली आहे.
- तर मंगळवारी दिवसभरात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. सध्या ओमिक्रॉनबाधितांची संख्या १६७ वर आहे.