Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धाडसी दीपाली चव्हाण यांना आत्महत्या का करावी लागली? वाचा त्यांच्याच शब्दात…

March 26, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
deepali chavan

मुक्तपीठ टीम

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे लिहिले आहे.

दिपाली चव्हाण यांची सुसाईड नोट त्यांच्याच शब्दात

सर ज्यावेळेस धुळघाट मधून माझी बदली हरिसालला झाली होती. तेव्हा मी खूप खुश होते. कारण माझ्यावर चौकशी सुरु असून देखील तुम्ही मला तुमच्याकडे घेतले होते. जेव्हा मला समजलं होतं की शीवकुमार सर मला DFO आहेत तेव्हा मला अजूनच आनंद झाला. सरांची काम करायची पद्धत मला आवडायची. ते माझ्याशी फार चांगले वागायचे. माझ्या रेंजची सर्व काम सगळ्यात आधी पूर्ण व्हायची. त्यामुळे आमची रेंज पुढे जायला लागली तेव्हा आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांनी DFO चे कान भरायला सुरुवात केली.

साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की त्यांनी कोणत्याही गोष्टीची खात्री न करता माझ्या नावाची नोटीस काढणे सुरु केले. काही खटकले तरी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले. माझ्याकडे ३ गावांचे पुनर्वसन आहे. मात्र साहेबांनी मला त्यांच्यासमोर शिव्या दिल्या. पुनर्वसन करताना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी कधीच माझी बाजू समजून घेतली नाही. नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडले. ते फक्त आणि फक्त मला कमीपण दाखवण्याचे कारण शोधत राहतात.

मार्च 2020 मध्ये त्यांनी मांगीया येथील अतिक्रमणबाबत मला फोन केला. तू आताच्या आता आरोपीला ताब्यात घे आणि अतिक्रमण हटवं, अशा सूचना दिल्या. यानंतर मी स्टाफला घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथील लोक शिवीगाळ करत होते. आम्ही त्यांनी फोनवर कळवल्यानंतरही ते आम्हाला तुम झूट बोल रहे हो, नाटक कर रहे हो असे म्हणाले.

deepali chavan suicide note (3)

जेव्हा गावकरी माझ्यावर अॅट्रोसिटी दाखल करणार होते, ते मी त्यांना कळवले त्यावेळी मी स्वत: SP ला बोलून तुमच्यावर अॅट्रोसिटी लावतो. चार महिने RFO जेलमध्ये राहिल्यानंतर कसे वाटते हे दाखवतो. याची रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे.

या आधी खासदार नवनीत राणा यांनाही ती रेकॉर्डिग ऐकवली आहे. अॅट्रोसिटीत बेल न झाल्याने मी सुट्टीवर गेले. त्यानंतर कोर्टाच्या निकालाबद्दल मी कळवले होते. पण शीवकुमार यांनी मला रुजू करुन घेण्यास नकार दिला. तसेच माझ्या रजा कालावधीतील सुट्टी नाकारण्याची शीफारस केली. त्यावेळी आपण देखील माझी सुट्टी नाकारली. मला पगार दिला नाही.

ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही.

रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.

माझ्या रेंजमधील सर्व काम करुनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरुन कामावर रुजू होत नव्हते पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला आहेत.

माझ्या स्टाफसमोर, गावकऱ्यांसमोर आणि मजूरांसमोर ते मला शिवीगाळ करतात. ते मला सहन होत नाही. त्यामुळे मी हे सांगत आहे. कित्येक वेळा रात्री त्यांनी मला बोलवले. माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मर्जीने न वागल्याची शिवकुमार सर मला शिक्षा देत आहेत. मला माहिती आहे, इतकं लिहूनही तुम्ही त्यांचं काहीही बिघडवू शकणार नाही.

deepali chavan suicide note (2) 

माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की, माझे रोखलेले वेतन तात्काळ द्यावे. माझ्या मृत्यूनंतरचे आर्थिक लाभ सर्व माझ्या आईला द्यावे. विनोद शिवकुमारबाबत तुमच्याकडे खूप तक्रारी येतात. कधी तरी त्यांना गांभीर्याने घ्या. कारण त्या व्यक्तीमुळे तुमचेही नाव खराब होत आहे. त्यांचे अधिकाऱ्यांसोबतचे वागणे खराब आहे. ते खूप घाण घाण शिव्या देतात. फिल्डवर फार त्रास देतात. ते माझ्याशी फार खराब बोलतात. त्याचा मला मानसिक त्रास होतो. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसरक्षक आहेत.

साहेब तुम्ही मला आतापर्यंत खूप सपोर्ट केला. तुमचे मनापासून आभार. माझ्या आईला सुखरुप गावी पोचवायला मदत करा आणि विनोद शिवकुमार यांच्यावर कारवाई कराल हीच शेवटची इच्छा. जे माझ्यासोबत झालं ते यापुढे इतर कोणासोबत होऊ नये.

दीपाली चव्हाण, RFO हरिसाल

Tags: RFO हरिसालअपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डीडीएफओ विनोद शिवकुमारवन्यक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाणसुसाईड नोट
Previous Post

मुंबईत कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाकडून १०० घरांमध्ये निवास व्यवस्था

Next Post

गुन्हे महत्वाचे : 1)दारूच्या नशेत विवाहितेने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत शिंदे यांनी प्रसंगावधान साधत तिचा जीव वाचविला. यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट करत त्यांचे कौतुक केले आहे. 2)मोबाईल चोरीच्या संशयावरुन डोंबिवलीत एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. संबंधित व्यक्तीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी दोन जणांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. 3)अभ्यासाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ६९ वर्षांच्या शिक्षकास तर दुसऱ्या घटनेतील २४ वर्षीय युवकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. चंद्रकांत वामन भालेराव आणि राहुल दौलत बोडके असे या आरोपींची नाव आहेत. 4)नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुरुवारी रात्री मोठी कारवाई केली. मुंबई शहरातील सर्वात मोठ्या ड्रग्ज सप्लायरच्या मुलाला अटक केली आहे. त्याच्याकडून २ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. 5)तळोजा येथील पिसार्वे गाव परिसरामध्ये हेरॉईन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने व अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी संध्याकाळी सापळा लावून अटक केली आहे. जसविंदर दलजित सिंग व साबिर रझाक पठाण अशी या दोघांची नावे असून गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांजवळ असलेले १०३ ग्रॅम वजनाचे १० लाख ३० हजार रुपये किमतीचेहेरॉइन तसेच, त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली स्कुटी व पल्सर मोटरसायकल जप्त केली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!