मुक्तपीठ टीम
कर्नाटकात मुसळधार पावसामुळे बंगळुरूला पूर आला आहे. ताज्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वारंवार बैठका घेत आहेत. या क्रमवारीत एका बैठकीत विचित्र परिस्थिती समोर आली. आढाव्यादरम्यान मुख्यमंत्री गांभीर्याने चर्चा करत असताना महसूलमंत्री आर अशोक गाढ झोप घेत होते. आता काँग्रेसने या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करून खिल्ली उडवली आहे.
कर्नाटक काँग्रेसने फोटो ट्विट करत मंत्र्यांची उडवली खिल्ली!
- कर्नाटक काँग्रेसने राज्यमंत्री आर अशोक यांचे फोटो शेअर करत त्यात लिहिले आहे की, पूरस्थितीच्या बैठकीत ते झोपले होते.
- फोटोमध्ये, राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत मंत्री डोळे बंद करताना दिसत होते.
- काँग्रेसने कन्नड भाषेत ट्विट करून लिहिले, “बुडण्याचे अनेक प्रकार आहेत! राज्यातील लोक पावसात बुडाले आहेत. मंत्री झोपेत आहेत! त्यांची अप्रतिम झोप. ‘हलाल कट’ म्हणजे ते जागे हतील! तुम्ही मंत्रींना सांगितले होते का?’ ज्याला चिंता नाही तो कायमचा झोपतो?’
बंगळुरूमध्ये पावसानंतर पूरसदृश परिस्थिती
- संततधार पावसामुळे बेंगळुरूमध्ये तीव्र पाणी साचले आहे.
- पावसामुळे अनेकांना घरे सोडावी लागली आहेत.
- सोमवारच्या पावसानंतर शहरात गल्ल्या, गल्ल्या जलमय झाल्या आहेत.
- पूरग्रस्त भागात राहणाऱ्या आयटी कंपन्यांचे अनेक कर्मचारी ट्रॅक्टर घेऊन कार्यालयात पोहोचले.