मुक्तपीठ टीम
कामधेनु गोविज्ञान प्रचार – प्रसार परीक्षा २०२१ आता पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रीय कामधेनु आयोगामार्फत ही परीक्षा घेण्यात येणार होती. यावर्षी ही परीक्षा २५ फेब्रुवारी रोजी होणार होती. आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षा पुढे ढकलण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. परंतु, आयोगाने अद्याप परीक्षेची नवीन तारीख जाहीर केलेली नाही. परीक्षा पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.
फेब्रुवारी २०१९ रोजी सरकारने गायींचे संवर्धन आणि विकासासाठी कामधेनु गोविज्ञान प्रचार – प्रसार परीक्षा गठन करणारा अध्यादेश काढला. तेव्हा वल्लभभाई कथिरिया हे अध्यक्ष होते. अलीकडेच त्याचा कार्यकाळ संपला. सुनील मानसिंहका आणि हुकुम चंद सावला यांचीही दोन वर्षांच्या मुदतीसाठी नियुक्ती करण्यात आली. या सदस्यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. आपल्या कार्यकाळात कथारियांनी अनेक वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यामुळे आयोगाचे काम कमी आणि ते वादांमुळे चर्चेत जास्त राहिले होते.