मुक्तपीठ टीम
खाम नदीच्या स्वच्छतेसाठीच्या उद्देशाने सुरू असलेल्या मोहिमेत विविध धर्मातील धार्मिक नेतेही सहभागी होत आहेत. त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेसोबत नदी स्वच्छतेच्या कार्यास सुरुवात केली आहे.
जेसी रेव्हरंड, टिम्थी शरद, आरबी गायकवाड, हाफिज अब्दुल हमीद, दत्तप्रसाद जोशी, मंगेश कुलकर्णी, रामकृष्ण बनेगाओकर, भदंत महाथेरो हर्षाबोधी, मंदिंदर सिंह ग्रंथी आणि राजा सिंह ग्रंथी असे सर्वधर्मीय धर्मगुरु पुढे आलेत. त्यांनी एकत्रितपणे नदीकाठावरील नागरिकांना खाम नदीत कचरा टाकू नका असे आवाहनही केले.
मुख्य बसस्थानकाच्या पाठीमागे वाहणाऱ्या नदीच्या काठावर वेगवेगळ्या देशी जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. या मोहिमेमध्ये नागरिक, विद्यार्थी आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवकही सहभागी झाले. औरंगाबाद मनपाचे प्रशासक अस्तिककुमार पांडे म्हणाले की, खाम नदीच्या स्वच्छतेच्या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त नियोजित कामे १ मेपूर्वीच करण्याचे प्रशासनाचे उद्दीष्ट आहे.
स्थानिक स्वयंसेवी संस्थांही उत्साहाने सहभागी होत आहेत. ६ फेब्रुवारीपासून आतापर्यंत लोकसहभागातून तीन मोहिमांद्वारे नदीचे वेगवेगळे भाग स्वच्छ करण्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
पाहा व्हिडीओ: