Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समिती

October 26, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Mantralaya

मुक्तपीठ टीम 

भूमि अभिलेख विभागातील गट ‘क‘ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल व वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश २५ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

            

भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावर उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर प्रदेशातील गट ‘क‘ संवर्गातील पदे भरण्यासाठी निवड समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक हे अध्यक्ष असतील. तसेच ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत तेथे अन्य विभागाचे उपसंचालक भूमि अभिलेख, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय समाजकल्याण अधिकारी, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त, ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील विभागीय सैनिक कल्याण अधिकारी हे सर्व या समितीमध्ये सदस्य असतील. तर ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागातील जिल्हा अधीक्षक  भूमि अभिलेख संलग्न उपसंचालक भूमि अभिलेख हे सदस्य सचिव या समितीमध्ये असतील.

            

जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या अनुपस्थितीत निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अप्पर जमाबंदी आणि भूमि अभिलेखचे अतिरिक्त संचालक कामकाज पाहतील. निवड समितीमध्ये आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त सदस्यांची निवड करण्याची मुभा जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांना राहील. ज्या विभागात पदे भरण्यात येणार आहेत त्या विभागात निवड समितीचे सदस्य म्हणून अन्य विभागातील भूमि अभिलेख उपसंचालक यांची नियुक्ती जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक यांच्या स्तरावरुन करण्यात येईल. असे शासन आदेशात नमूद आहे.


Tags: amravatiAurangabadDepartment of Land Recordskokannagpurnashikpuneअमरावतीऔरंगाबादकोकणनागपूरनाशिकपुणेभूमि अभिलेख विभाग
Previous Post

नानाभाऊ शब्दाला जागणारे, इतरांसारखे थापा मारणारे नाही!: लोककलावंत कडूबाई खरात

Next Post

वानखेडेंचे जात प्रमाणपत्र खोटे निघाले तर अडचणी वाढण्याची शक्यता!

Next Post
malik nd wankhede

वानखेडेंचे जात प्रमाणपत्र खोटे निघाले तर अडचणी वाढण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!