मुक्तपीठ टीम
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये साईट सिव्हिल इन्स्पेक्टर या पदासाठी ८० जागा आणि साईट इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर या पदासाठी ४० जागा अशा एकूण १२० पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १४ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, पद क्र.१ आणि पद क्र.२ साठी i) ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांना ५५% गुण असणे आवश्यक आहे.) ii) ४ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय, १४ एप्रिल २०२१ पर्यंत ३५ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट https://www.nbccindia.com/वरून माहिती मिळवू शकता.