मुक्तपीठ टीम
फूड कॉरपोरेशन ऑफ इंडिया एफसीआयने असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मेडिकल ऑफिसर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १ मार्च २०२१ रोजी सुरू झाली आहे. ही प्रक्रिया ३१ मार्च २०२१ पर्यंत चालणार आहे. ही भरती ८९ पदांची आहे. शेवटची तारीख पार झाल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारले जाणार नाही. या रोजगारसंधीच्या अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
वयो मर्यादा
एजीएम पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ३० वर्षे असावे. त्याचबरोबर एससी ३, एसटी ३, ओबीसी ९, यूआरच्या ३० जागांसाठी नेमणुका घेण्यात येतील. याशिवाय एजीएम टेक्निकल, एससी ५, एसटी १, ओबीसीच्या ४ आणि यूआरच्या १४ जागांच्या सर्वसाधारण २८ जागांसाठी नेमणुका करण्यात येतील.
शुल्क
एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना एफसीआयने काढलेल्या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्याचबरोबर सामान्य उमेदवारांना १००० रुपये द्यावे लागतील.
या भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी केवळ अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.fci.gov.in च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
पाहा व्हिडीओ: