मुक्तपीठ टीम
कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत ‘नॉन रिसर्च मॅनेजमेंट पोजिशन’ पदाच्या १) प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, २) हेड ऑफ डिव्हिजन, हेड ऑफ रीजनल स्टेशन/ सेंटर, ३) सिनियर सायंटिस्ट-कम-हेड, केव्हीके या पदांवर एकूण ३४९ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, पद क्र.१ आणि २ साठी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत तर, पद क्र. ३ साठी ११ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) डॉक्टोरल पदवी २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १, २ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६० वर्षांपर्यंत तर, पद क्र. ३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४७ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १५०० रूपये शुल्क आकारले जाणार एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइट http://www.asrb.org.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
http://www.asrb.org.in/vacancy
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1peFAccNJ6clBH9xChzcNVCqTq2aGQG_f/view








Subscribe