मुक्तपीठ टीम
कोकण रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटची भरती आहे. या भरतीसाठी २० ते २३ एप्रिल दरम्यान वॉक-इन-इंटरव्ह्यू आयोजित केले आहेत. अर्ज करणारे पात्र इच्छुक उमेदवार konkanrailway.com या अधिकृत वेबसाइटवर, अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, कोकण रेल्वेने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, जूनियर टेक्निकल असिस्टेंट (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा उच्च शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन/ यांमध्ये किमान ६०% गुणांसह इंजिनिअरिंग (बीई / बीटेक) डिग्रीसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०२१ रोजी पर्यंत २५ वर्ष असावे.
वॉक-इन-इंटरव्ह्यू संबंधित सूचना
वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना कोकण रेल्वेने दिलेला अर्ज भरावा लागेल व तो आपल्या बरोबर घेऊन जावा लागेल. तसेच, आपल्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती घ्यावी लागतील. तसेच उमेदवारांना सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान मुलाखतीसाठी नोंदणी करावी लागेल. बाहेरील उमेदवारांना कमीतकमी २ ते ३ दिवस राहण्याची व्यवस्था करावी लागेल. कोकण रेल्वेकडून कोणताही टीए / डीए देय होणार नाही. यूएसबीआरएल प्रोजेक्ट हेड ऑफिस, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्सटेंशन-त्रिकुट नगर, जम्मू येथे वॉक-इन-इंटरव्ह्यू आहेत.