मुक्तपीठ टीम
उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत फिजिशियन या पदासाठी १० जागा, भूलतज्ञ या पदासाठी १० जागा, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी २५ जागा, परिचारिका (जीएनएम) आणि प्रसविका (एएनएम) या पदासाठी २६६ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ६ जागा, औषध निर्माता या पदासाठी ६ जागा, वॉर्ड बॉय/बेड साईड असिस्टंट या पदासाठी ३१ जागा अशा एकूण ३५४ पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ आणि १६ एप्रिल रोजी मुलाखत देऊ शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एमबीबीएस (एमडी)
२) पद क्र.२- एमबीबीएस (एमडी)/ एमबीबीएस (डीए)
३) पद क्र.३- एमबीबीएस/ बीएचएमएस+बीडीएस
४) पद क्र.४- १)१२वी (विज्ञान) उत्तीर्ण २) जीएनएम
५) पद क्र.५- १)१०वी उत्तीर्ण २) एएनएम
६) पद क्र.६- १) एम.एससी २) बी.एससी+ डीएमएलटी
७) पद क्र.७- डी.फार्म
८) पद क्र.८- १)१०वी उत्तीर्ण २) बेड साईड असिस्टंट कोर्स असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट http://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/English/index.html वरून माहिती मिळवू शकता.