मुक्तपीठ टीम
भारतीय स्टेट बँकेमध्ये मॅनेजर, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव, सिनियर एक्झिक्युटिव, डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर, एक्झिक्युटिव, डेप्युटी मॅनेजर, चीफ एथिक्स ऑफिसर, एडवाइजर, फार्मासिस्ट, डाटा एनालिस्ट अशा एकूण १४९ पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) एमबीए/ पीजीडीबीएम किंवा समतुल्य/ कला शाखेत पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी २) ३/५/६ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) कोणत्याही शाखेतील पदवी /पीजीडीबीएम किंवा समतुल्य /एमबीए/पीजीडीएम २) ४/५ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) एमबीए/पीजीडीबीएम २) ३ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १) बी.टेक./ बी.ई./ एम. एससी./एम. टेक. /एमसीए २) १५ वर्षे अनुभव
५) पद क्र.५- १) ६०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री) २) १ वर्ष अनुभव
६) पद क्र.६- १) एमबीए/पीजीडीएम/सीए/बीई/ बी. टेक (आयटी शाखा) २) ३/४ वर्षे अनुभव
७) पद क्र.७- बँकिंग किंवा वित्तीय संस्था किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात किमान २० वर्षांचा अनुभव
८) पद क्र.८- १) उमेदवार निवृत्त झाल्यावर पोलीस उप अधिक्षक पदाच्या खाली नसलेला निवृत्त आयपीएस / राज्य पोलीस अधिकारी असावा. दक्षता / आर्थिक गुन्हे / सायबर गुन्हे विभागात (हँडल) काम केले पाहिजे. २) ५ वर्षे अनुभव
९) पद क्र.९- १०वी उत्तीर्ण+ डी.फार्मा+ ३ वर्षे अनुभव किंवा बी.फार्मा/ एम.फार्मा/ फार्मा डी + १ वर्ष अनुभव
१०) पद क्र.१०- १) ६०% गुणांसह (बी.ई/बी. टेक/ एम.ई/एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स/आयटी/डाटा सायन्स/मशीन लर्निंग अॅन्ड एआय) २) ३ वर्षे अनुभव
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय पद क्र.१- १८ ते ३५ वर्षे, १८ ते ४० वर्षे, १८ ते ३० वर्षे
२) पद क्र.२- २८ ते ३५, २६ ते ३० वर्षे
३) पद क्र.३- २५ ते ३५ वर्षे
४) पद क्र.४- ४५ वर्षांपर्यंत
५) पद क्र.५- ३० वर्षांपर्यंत
६) पद क्र.६- २६ ते ३० वर्षे, २५ ते ३५ वर्षे
७) पद क्र.७- ५५ ते ६२ वर्षे
८) पद क्र.८- ६३ वर्षांपर्यंत
९) पद क्र.९- १८ ते ३० वर्षे
१०) पद क्र.१०- १८ ते ३५ वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: