मुक्तपीठ टीम
भारतीय स्टेट बँकेत फायर इंजिनीअर या पदासाठी एकूण १६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) बी.ई. (फायर) किंवा बी.ई./ बी.टेक/ बी.एससी (फायर) किंवा समतुल्य २) ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.