मुक्तपीठ टीम
भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये असिस्टंट कोच या पदासाठी १०० जागा, कोच या पदासाठी २२० जागा अशा एकूण ३२० जागांसाठी भरती आहे. ही फक्त महिलांसाठी विशेष भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एसएआय, एनएस, एनआयएस कडून कोचिंग डिप्लोमा + ५ वर्षे अनुभव किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग + ५ वर्षे अनुभव किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त.
२) पद क्र.२- एसएआय, एनएस, एनआयएस कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४५ वर्षांपर्यंत तर पद क्र.२ साठी ४० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट https://sportsauthorityofindia.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: