मुक्तपीठ टीम
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदावर एकूण ८८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी+एनईटी/ एसईटी किंवा पीएच.डी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ओबीसी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून २५० रूपये शुल्क आकारले जाणार.
अर्ज कसा करावा
अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच पीडीएफ मध्ये तयार करून est.section@sus.ac.in या ईमेल आयडी वर पाठवा.
अधिक माहितीसाठी
सोलापूर विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट http://su.digitaluniversity.ac/ वरून माहिती मिळवू शकता.








Subscribe
Interview list when will be released.inform plz