मुक्तपीठ टीम
पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ०६ जागा, बालरोगतज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ०२ जागा, एएनएम या पदासाठी १६६ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी ३४ जागा अशा एकूण २०८ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- एमबीबीएस
- पद क्र.२- एमडी Paed/ ओएनबी/ ओसीएच
- पद क्र.३- एएनएम कोर्स
- पद क्र.४- १२वी उत्तीर्ण +जीएनएम किंवा बी.एससी (नर्सिंग)असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अधिकृत वेबसाइट https://arogya.maharashtra.gov.in वरून माहिती मिळवू शकता.