मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी या पदासाठी २९ जागा, प्रशिक्षणार्थी लिपिक या पदासाठी १६६ जागा अशा एकूण १९५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०८ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- पद क्र.१- १) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.२- ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पद क्र.१ साठी २३ ते ३२ वर्षांपर्यंत तर पद क्र.२ साठी २१ ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १ हजार ७७० रूपये शुल्क आकारले जाणार तर, पद क्र.२ साठी उमेदवारांकडून १,१८० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mscbank.com/ वरून माहिती मिळवू शकता.