मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय विभागात जिल्हा शल्क चिकित्सक संवर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, शरीर विकृती शास्त्रज्ञ, मनोविकृती चिकित्सक, नेत्र शल्कचिकित्सक, बधिरीकरण तज्ज्ञ, क्ष किरण शास्त्रज्ञ, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, विशेष अधिकारी (स्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी (कान, नाक & घसा), वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सा), वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ज्ञ) या पदांसाठी एकूण ३७० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) एमबीबीएस/ एमडी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य २) अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ७१९ रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकडून ४४९ रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.