मुक्तपीठ टीम
भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं विमा सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एलआयसीनं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं १०० जागांवर भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवार भारत सरकार मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असावा. निवड झाल्यानंतर त्याला मार्केटिंग आणि सेल्समध्ये काम करावं लागेल.
पात्रता
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
- उमेदवार भारत सरकार मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असावा.
- निवड झाल्यानंतर त्याला मार्केटिंग आणि सेल्समध्ये काम करावं लागेल.
अर्ज कधी आणि कुठे करावा?
- एलआयसीनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार https://licindia.in/ या वेबसाईटवर अर्ज करता येईल.
- उमेदवारांनी एलआयसीच्या वेबसाईटवर नोंदणी करुन अर्ज सादर करावेत.
- एलआयसीच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
वेतन
एलआयसीकडून विमा सल्लागार म्हणून निवड होणाऱ्या उमदेवारांना ७ ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान मानधन दिलं जाणार आहे.
अधिक माहितीसाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: