मुक्तपीठ टीम
पोलीस सेवेत संधी शोधणार्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. आयटीबीपीने क्रीडा कोट्यातून कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागविले आहेत. नोंदणी प्रक्रिया ५ जुलैपासून सुरू झाली आहे आणि २ सप्टेंबर २०२१ रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा त्याची समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचं वय १८ वर्षे ते २३ वर्षेांदरम्यान असावे.
शुल्क
उमेदवारांनी अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील.
निवड प्रक्रिया
- आयटीबीपीद्वारे १२ वेगवेगळ्या खेळामध्ये प्राविण्य मिळविलेल्या एकूण ६५ जागांसाठी जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल भरती केली जाणार आहे.
- जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल ही पदे ग्रुप सी अंतर्गत येतात.
- उमेदवारांना कागदपत्रे, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि तपशीलवार वैद्यकीय चाचणीसाठी हजर रहावे लागेल.
- सर्व प्रवर्गांसाठी म्हणजेच यूआर / एससी / एसटी / ओबीसी उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण ०८ असेल.
अधिक माहितीसाठी
आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाइट https://recruitment.itbpolice.nic.in/वरून माहिती मिळवू शकता.