मुक्तपीठ टीम
इंटेलिजंट कम्युनिकेशन सिस्टम इंडिया लिमिटेड अंतर्गत मल्टी टास्किंग टास्क या पदासाठी एकूण 50 जागांसाठी भरती आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 24 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, मॅट्रिक किंवा समकक्ष/ आयटीआय पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी इंटेलिजंट कम्युनिकेशन सिस्टम इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://icsil.in/ वरून माहिती मिळवू शकता.