मुक्तपीठ टीम
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी- १/ कार्यकारी या पदासाठी ७० जागा, सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-२/ कार्यकारी या पदासाठी ३५० जागा, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी -१/ कार्यकारी या पदासाठी ५० जागा, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी -२/ कार्यकारी या पदासाठी १०० जागा, सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी या पदासाठी १०० जागा, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी- १ या पदासाठी २० जागा, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी- २ या पदासाठी ३५ जागा, सुरक्षा सहाय्यक या पदासाठी २० जागा, कुक या पदासाठी ०९ जागा, केअरटेकर या पदासाठी ०५ जागा अशा एकूण ७६६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
इंटेलिजन्स ब्युरोने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या विविध पदांसाठी भरतीसंबंधित अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे नियुक्त झालेल्या उमेदवारांना प्रतिनियुक्तीवर नियुक्त केले जाईल.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, केंद्रीय पोलीस संघटना/ राज्य पोलीस संघटना/ संरक्षण दलातील अधिकारी हे इंटेलिजन्स ब्युरोने जारी केलेल्या विविध पदांसाठी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शुल्काविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकृत वेबसाइट https://www.mha.gov.in/centralpoliceorganization/intelligence-bureau वरून माहिती मिळवू शकता.