मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलात १०+२ (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीम या पदावर एज्युकेशन ब्रांचमध्ये ५ जागा, एक्झिक्युटिव्ह अॅंड टेक्निकल ब्रांचमध्ये ३० जागा अशा एकूण ३५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) १२वी उत्तीर्ण (पीसीएम- ७०% गुण, एसएससी/ एचएससी इंग्रजी- ५०% गुण) २) जेईई (मेन)-२०२१ असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.








Subscribe