मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक, जीडीएस अशा एकूण २४२८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, गणित व इंग्रजी विषयांसह दहावी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर उमेदवाराने किमान दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या यूआर/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी/ एसटी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
जीडीएस पोस्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी आधी अधिकृत संकेतस्थळावर
https://appost.in/gdsonline/Home.aspx जावे लागेल.
अधिक माहितीसाठी
भारतीय डाकच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: