मुक्तपीठ टीम
रासायनिक तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) मुंबई येथे प्रकल्प सहकारी एक या पदासाठी १० जागा, प्रकल्प सहकारी दोन या पदासाठी ५ जागा अशा एकूण १५ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) एम. केमीकल. इंजिनीअरिंग किंवा समतुल्य २) सिन्थेसीस ऑफ ड्रग्स/ फार्मास्यूटिकल्स / रसायने आणि शुद्धिकरणामध्ये
१ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
आयसीटीच्या अधिकृत वेबसाइट https://www.ictmumbai.edu.in/Default.aspx वरून माहिती मिळवू शकता.