मुक्तपीठ टीम
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएलने ट्रेड अॅप्रेंटिसशिपसाठी अधिसूचना जारी केली आहेत. बारावी उत्तीर्ण झालेले पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. एचएएलने अॅप्रेंटिस कायदा १९६१ अंतर्गत ही भरती जाहीर केली आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार हा गणित किंवा विज्ञान विषयात बारावी उत्तीर्ण असावा.
या व्यतिरिक्त, अर्जदार फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, रेफ्रिजरेशन / एसी, ड्राफ्ट्समन आणि एनसीव्हीटी द्वारे प्रमाणित असावे. तसेच उमेदवारांनी सन २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेले असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
एचएएलच्या अधिकृत वेबसाइट hal-india.co.in वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: