मुक्तपीठ टीम
गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटिस (ईएक्स-आयटीआय), ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर), पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, एचआर ट्रेनी या पदांसाठी एकूण 262 जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 7 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, 1) पद क्र.1- ऑल इंडिया ट्रेड टेस्ट
2) पद क्र.2- 10वी उत्तीर्ण
3) पद क्र.3- संबंधित विषयात बीई/ बी.टेक
4) पद क्र.4- संबंधित विषयात इंजिनीअरिंग/ टेक्नोलॉजी डिप्लोमा
5) पद क्र.5- 60% गुणांसह एमबीए/ पीजी पदवी/ पीजी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 ते 26 वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://grse.in/ वरून माहिती मिळवू शकता.