मुक्तपीठ टीम
गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये जनरल फिटर या पदासाठी ५ जागा, इलेक्ट्रिकल मेकॅनिक या पदासाठी १ जागा, कमर्शियल असिस्टंट या पदासाठी १ जागा, टेक्निकल असिस्टंट (क्यूए) या पदासाठी ३ जागा, अनस्किल्ड (अकुशल), या पदासाठी २५ जागा, एफआरपी लॅमिनेटर या पदासाठी ५ जागा, इओटी क्रेन ऑपरेटर या पदासाठी १० जागा, वेल्डर या पदासाठी २६ जागा, स्ट्रक्चरल फिटर या पदासाठी ४२ जागा, नर्स या पदासाठी ३ जागा, टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल) या पदासाठी २ जागा, टेक्निकल असिस्टंट (स्टोअर) या पदासाठी ५ जागा, ट्रेनी खलाशी या पदासाठी ९ जागा अशा एकूण १३७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ४ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि गोवा येथे आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) एसएससी २) आयटीआय/ एनसीटीव्हीटी (फिटर/फिटर जनरल)
२) पद क्र.२- १) एसएससी २) आयटीआय (इलेक्ट्रिशियन) ३) २ वर्षे अनुभव
३)पद क्र.३- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) कॉम्प्युटर कोर्स ३) १ वर्ष अनुभव
४) पद क्र.४- १) शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा २) २ वर्षे अनुभव
५) पद क्र.५- १)एसएससी २) १ वर्ष अनुभव
६) पद क्र.६- १) एफआरपी विषयासह शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा २) २ वर्षे अनुभव
७) पद क्र.७- १) एसएससी २) आयटीआय ३) २ वर्षे अनुभव
८) पद क्र.८- १) आयटीआय/ एनसीटीव्हीटी (वेल्डर) २) २ वर्षे अनुभव
९) पद क्र.९- १) आयटीआय (स्ट्रक्चरल फिटर/फिटर/फिटर जनरल / शीट मेटल वर्कर) २) २ वर्षे अनुभव
१०) पद क्र.१०- १) बी.एससी(नर्सिंग) किंवा नर्सिंग अॅन्ड मिडवाइफरी डिप्लोमा कोर्स २) २ वर्षे अनुभव
११) पद क्र.११- १) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा २) २ वर्षे अनुभव
१२) पद क्र.१२- १) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/प्रोडक्शन/फॅब्रिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा २) २ वर्षे अनुभव
१३) पद क्र.१३- १) आयटीआय/ एनसीटीव्हीटी (फिटर/फिटर जनरल) २) २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तर, इतर जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी
गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://goashipyard.in/ वरून माहिती मिळवू शकता.