मुक्तपीठ टीम
मुंबईच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध विभागातील रेसिडंट ऑफिसर पदासाठी संधी आहे. त्याअंतर्गत एकूण २० पदे भरती करण्यात येणार आहेत. पात्र उमेदवार मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ कार्यालयात १५ जुलै रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर परीक्षा एम डी, डीएनबी आणि एमबीएबीएस उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे. एबबीस असणाऱ्या उमेदवारांकडे दोन वर्षांचा अनुभव असणं देखील गरजेचं आहे.
वयोमर्यादा
अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच वय २१ ते ३५ दरम्यान असणं आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुंबईतील कर्मचारी राज्य बीमा निगम कार्यालयाचं रुग्णालय कांदिवली, अकुरली रोड, कांदिवली पूर्व, येथील कार्यालायत मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी
ईएसआयसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.esic.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.