मुक्तपीठ टीम
एमपीएससी मार्फत पशुसंवर्धन विभागात सहायक आयुक्त, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदासाठी एकूण ३८ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, पशुवैद्यक शास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ३९४ रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ उमेदवारांकडून २९४ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.