मुक्तपीठ टीम
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच बीईएल या नवरत्न कंपनीने बंगळुरू मिलिटरी कम्युनिकेशन एसबीयू अभियंता पदासाठी जाहिरात काढली आहे. प्रशिक्षणार्थी अभियंता -१च्या एकूण ३० पदांवर कंत्राटी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार २१ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,बीईएल प्रशिक्षणार्थी अभियंता भरती २०२१ च्या अधिसूचनेनुसार, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इतर संबंधित व्यवहारांमध्ये चार वर्षांची पूर्ण-वेळ बीई/बीटेक पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
१ एप्रिल २०२१ रोजी उमेदवारांचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. एससी/एसटी/ओबीसी आणि इतर राखीव वर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात आलीय.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अशी होईल निवड
- बीईएल प्रशिक्षणार्थी अभियंता भरती २०२१च्या अधिसूचनेनुसार उमेदवारांची निवड बीई/बीटेक गुण, संबंधित कामाचा अनुभव आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
- बीई/बीटेक गुणांसाठी ७५%, अनुभवासाठी १०% आणि मुलाखतीसाठी १५% वेटेज निश्चित केले गेले आहेत.
असा करावा अर्ज
- अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर करिअर सेक्शनमध्ये जा.
- नंतर मिलिटरी कम्युनिकेशन एसबीयू बंगळूरू कॉम्प्लेक्स ट्रेनी इंजिनीअर रिक्रूटमेंट सेक्शनमध्ये दिलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करा.
- अर्ज पानावर जा, जिथे उमेदवारांना प्रथम साईनअप करावे लागेल.
- त्यानंतर आपला नोंदणी फॉर्म भरा
- आपली कागदपत्रे अपलोड करा.
- त्यानंतर सॉफ्ट कॉपी स्वतःकडे ठेवा.
अधिक माहितीसाठी
बीइएलच्या अधिकृत वेबसाइट bel-india.inवरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: