मुक्तपीठ टीम
पुणे शहरात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल प्रोजेक्ट इंजिनिअर-१ या पदासाठी १० जागा, सिव्हिल/ इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट इंजिनिअर-१ या पदासाठी ०२ जागा, ट्रेनी इंजिनीअर-१ या पदासाठी ०८ जागा अशा एकूण २० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आणि नागपूर आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल बीई किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल बी.टेक २) ०२ वर्ष अनुभव
- पद क्र.२- १) बीई/ बी.टेक (सिव्हिल/ इलेक्ट्रिकल) २) ०२ वर्ष अनुभव
- पद क्र.३- बीई/ बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ आणि २ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३२ वर्षांपर्यंत, पद क्र. ३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्काविषयीची अजून कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि ईमेल
- वरिष्ठ उप. महाव्यवस्थापक (एचआर अॅंड ए), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एन.डी.ए. रोड, पाषाण, पुणे- ४११०२१
- contengr-1@bel.co.in
अधिक माहितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://bel-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.