मुक्तपीठ टीम
कोल्हापूरमध्ये बॅंक ऑफ इंडियात फॅकल्टी मेंबर, अटेंडंट या पदांसाठी एकूण ०२ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण कोल्हापूर आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) फॅकल्टी मेंबर- पदवी, व्यावसायिक कार्यक्रम डिप्लोमा, मूलभूत संगणक ज्ञान
२) अटेंडंट- १०वी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
फॅकल्टी मेंबर या पदासाठी उमेदवारांचे वय २५ ते ६५ वर्ष तर, अटेंडंट या पदासाठी उमेदवारांचे वय १८ ते ६५ वर्ष वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर विभागीय कार्यालय, १५१९ सी, जयधवल, बिल्डिंग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर
अधिक माहितीसाठी बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://bankofindia.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.