मुक्तपीठ टीम
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली बातमी आहे. बँक ऑफ बडोदा आणि देशातील इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपन्यांपैकी एक असलेल्या बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेडने दोन पदांवर भरती जाहीर केल्या आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार तंत्रज्ञान विभागात सहाय्यक व्यवस्थापक-आयटी अॅप्लिकेशन सपोर्ट (इंस्टीट्यूशनल ट्रेडिंग) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचबरोबर, रिटेल ब्रोकिंग विभागात वरिष्ठ व्यवस्थापक / सहाय्यक उपाध्यक्ष – रिटेल इक्विटी प्रोडक्टस या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी पदवीधर असावा. संबंधित पीजी डिग्री असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवारास किमान ६ वर्षांचा अनुभव असावा. २) वरिष्ठ व्यवस्थापक / एव्हीपी पदांसाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. संबंधित पीजी पदवीला प्राधान्य दिले जाईल. उमेदवारास किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
इमेल आयडी
इच्छुक उमेदवार कंपनीच्या भरतीसाठी त्यांचे तपशील या @ bobcaps.in ईमेल आयडी वर अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वरून माहिती मिळवू शकता.