मुक्तपीठ टीम
बँक ऑफ बडोदामध्ये सिनियर रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी ४०७ जागा, इ-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी ५० जागा, टेरिटरी हेड या पदासाठी ४४ जागा, ग्रुप हेड या पदासाठी ६ जागा, प्रोडक्ट हेड (इन्वेस्टमेंट अॅन्ड रिसर्च) या पदासाठी ०१ जागा, हेड (ऑपरेशन्स अॅन्ड टेक्नोलॉजी) या पदासाठी ०१ जागा, डिजिटल सेल्स मॅनेजर या पदासाठी ०१ जागा, आयटी फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर या पदासाठी ०१ जागा, अशा एकूण ५११ पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. २) पद क्र.१ साठी ३ वर्षे अनुभव, पद क्र.२ साठी २ वर्षे अनुभव, पद क्र.३ साठी ६ वर्षे अनुभव, पद क्र.४ साठी १० वर्षे अनुभव, पद क्र.५ साठी ७ वर्षे अनुभव, पद क्र.६ साठी १० वर्षे अनुभव, पद क्र.७ साठी ५ वर्षे अनुभव, पद क्र.८ साठी ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २४ ते ३५ असावे, पद क्र.२ साठी २३ ते ३५, पद क्र.३ साठी २७ ते ४०, पद क्र.४ साठी ३१ ते ४५, पद क्र.५ साठी २८ ते ४५, पद क्र.६ साठी ३१ ते ४५, पद क्र.७ साठी २६ ते ४०, पद क्र. ८ साठी २६ ते ३५ वय असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १०० रुपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी
बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: