मुक्तपीठ टीम
एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प, ड्यूटी मॅनेजर- पॅक्स, ड्यूटी ऑफिसर-पॅक्स, ड्यूटी ऑफिसर-कार्गो, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह-पॅक्स, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह-टेक्निकल, कस्टमर एजंट, ज्युनियर कस्टमर एजंट, रॅम्प सर्व्हिस एजंट, सिनियर रॅम्प सर्व्हिस एजंट, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमन या पदांवर एकूण १ हजार १८४ जागांवर नोकरीची संधी आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होणार आहे. पद क्र. १ ते ७ वर अर्ज करण्यसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार, ४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात तर, पद क्र. ८, ९ साठी ५ एप्रिल २०२२, पद क्र. १०, ११ साठी ०७ एप्रिल २०२२, पद क्र. १२ साठी ०९ एप्रिल २०२२, पद क्र. १३ साठी ११ एप्रिल २०२२ यादिवशी भेट देवू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, पदांनुसार आणि नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १ ते ३ साठी ५५ वर्षांपर्यंत, पद क्र. ४ आणि ५ साठी ५० वर्षांपर्यंत, पद क्र. ६ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र. ७ ते १० आणि १२, १३ साठी २८ वर्षांपर्यंत, पद क्र. ११ साठी ३० वर्षांपर्यंत पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मुलाखतीच्या ठिकाणाचा पत्ता
सिस्टीम आणि ट्रेनिंग डिव्हिजन दुसरा मजला, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन जवळ, सीएसएमआय विमानतळ टर्मिनल-२, गेट नंबर-५, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००९९
अधिक माहितीसाठी एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://www.aiasl.in/ वरून माहिती मिळवू शकता.