मुक्तपीठ टीम
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्स कल्याणीने प्राध्यापकांच्या १४७ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार १८ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमसीआय मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीबीएस/ एमडी/ डीएम पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे वय ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार वयात सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी अर्ज करणऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, अनुभव आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
पगार
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा वेतन मॅट्रिक्स लेव्हल -१२ ते लेव्हल -१४ एनुसार देण्यात येईल.
अर्ज फी
अर्ज शुल्क जनरल प्रवर्गाला १००० रुपये, रिजर्व प्रवर्गाला कोणतेही शुल्क आकारलेले नाही.
अधिक माहितासाठी
एम्स कल्याणीच्या अधिकृत iiimskalyani.edu.in/rec वर माहिती मिळू शकेल.